आज असंख्य मराठी जनांची मराठी ही ‘बोली’ आहे. तिला ‘अभिजात’ म्हणणे एका परीने या बोलीला ‘बोल’ लावल्यासारखे होईल!
मराठी ही संस्कृतइतकीच जुनी असेल तर संस्कृत इ.स. ७०० ते इ.स. १००० या काळातील असायला हवी. कुलकर्णी म्हणतात की, एक मत असे आहे की, वेदसमकालीन ज्या बोली होत्या, त्यापासून मराठी उद्भवली व ह्याला आधार म्हणजे वेदात जे संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत व प्राकृत भाषांच्या स्वभावाशी जुळणारे विशेष सापडतात ते होत. या प्रतिपादनाला आमचे समितिसदस्य आनंदाने एकमेकांना टाळ्या देऊ लागतील, पण .......